Thursday, June 18, 2026
Latest:
ठळक बातम्या

झा प्रकरणात बब्बर शेर बनून उड्या मारणारे, फैजान प्रकरणात शेपूट आत घालून गप का?

कल्याणमधील गोकुळ झा प्रकरण उकलल्यानंतर मराठी मीडियाने, स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्यांनी, आणि काही संघटनांनी झ्या विरोधात बब्बर शेर बनून संतापाची लाट उठवली. झा एका मराठी तरुणीला मारहाण करतो, फरार होतो, आणि अखेर मनसेसह स्थानिकांच्या दबावात पोलिसांच्या तावडीत सापडतो.

कल्याण रुग्णालयाची घटना: माध्यमांच्या कटातून जन्माला आलेला भाषिकवाद अर्धसत्य, सत्याचा दुसरा चेहरा?

कोर्टात हजर होताना देखील झ्याचा माज कायम राहतो, “परत तुम्हाला भेटतो” अशी पत्रकारांना धमकी देतो. त्याचा गुन्हेगारी इतिहास देखील मोठ्या आवाजात छापून येतो.

डोंबिवली येथे भारतीय मजदूर संघाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त गौरव रॅलीचे उत्साही आयोजन

मीडिया, राजकीय पक्ष, आणि आंदोलक सबंध कल्याण, डोंबिवली परिसर गाजवतात. पोलिसांवर दबाव, निषेध, “मराठी अस्मिता” या नावाखाली प्रचंड राजकीयरण दिसते; हाणामारी ते सोशल मीडिया ट्रेंडपर्यंत सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटतात.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून येथे येऊन स्थायिक झालेल्या मराठी माणसापासून परप्रांतीयपेक्षा जास्त धोका

दुसरीकडे, नवी मुंबईतील फैजान प्रकरण. येथे एका मराठी तरुणावर “मराठी बोलतोस” म्हणून अमराठी टोळक्याने हल्ला केला, हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली.

हॉस्टेलमधून संरक्षणाच्या आघाडीवर: ‘अपोलियन डायनॅमिक्स’च्या जयंत आणि सौर्य यांची यशोगाथा

गुन्हा दाखल झाला, तपास सुरू आहे, पोलिसांकडे निवेदनही देण्यात आले—पण ना मीडिया आक्रमक सुरात, ना राजकीय/सामाजिक संघटनांचा विद्रोह, ना सोशल मीडियावर तीव्र आंदोलन दिसून येते.

स्टील उत्पादन, हजारो रोजगार आणि कोटी वृक्षांची लागवड – गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा!

फैजानपर्यंत संतप्त आंदोलन पोचतंच नाही; जो सूर झा प्रकरणात आहे, तितकीच फैजान प्रकरणात तीव्रता आणि सामाजिक दबाव नाही. उलट, या घटनेचे वार्तांकन मर्यादित आणि निगेटिव्हपणाने केले जाते; शब्दातही संयम जाणवतो, मुद्दाम शाब्दिक “हाणामारी” टाळली जाते.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा जुनं राजकीय नाटक सुरू: भाजपनी स्वीकारली तीच रणनीती, पुन्हा मार खाणार हिंदीभाषिक!

का होतो हा फरक?
पहिली बाजू: झा प्रकरणातील आरोपी परप्रांतीय असल्यामुळे, ‘मराठी अस्मिता धोक्यात’ असा भावनिक रंग मिळतो. यातून मीडिया व समाजाने बड्या घोषणा, थेट प्रश्न, संतप्त प्रतिक्रिया दिल्या.

दुसरी बाजू: फैजानचा विषय कलमांमध्ये जाऊन हरवत राहतो, आरोपीसाठी तीव्र विरोध होत नाही; ना तो ‘राजकीय मुद्‌दा’ बनतो, ना संबंधित संघटना ‘तापतात’. सामाजिक दबाव, “हायलाइटिंग” इथे दिसत नाही.

गोकुळ झा विरोधात बब्बर शेरासारखा माज, मीडिया हायप, सरकारी यंत्रणेला जागं करणारे कार्यकर्ते… पण फैजानसारख्या प्रकरणात अचानक सगळ्यांची “शेपूट आत” जाते, वाद निवळतो, आवाज थंडावतो, सगळे ‘फॉर्मॅलिटी’ पुरतीच भूमिका निभावतात.

महाराष्ट्र : हिंदी–मराठी वादामागे भाजपची रणनीती?

येथेच खरा प्रश्‍न उपस्थित होतो — “मराठी अस्मिता” फक्त ठराविक वेळेसच पेटते का? बब्बर शेरचं रुप झा प्रकरणापुरतंच, फैजानसारख्या प्रकरणात कशासाठी ‘शांत’ पडतो?

या दुटप्पीपणावर समाजाने, मीडियाने आणि संघटनांनी आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. अन्याय कधीच जात-धर्म-पार्श्वभूमी पाहून प्रतिक्रिया मिळायला नको, ती नेहमीच सारखी आणि बिनधास्त असावी, हेच आपल्या तक्रारीतून अधोरेखित होते.

“मुंबई आसपास” कधीही आरोपी झा याचे समर्थन करत नाही. त्याने अपराध केला आहे तर त्याला शिक्षा मिळायलाच हवी.

पण रिसेप्शनिस्ट आणि झा प्रकरणामध्ये कुठेही हिंदी आणि मराठी वाद नव्हता. हे परिस्थितीजन्य अपराध होते.

कोणाने आधी मारले किंवा कोणाने नंतर मारले, याबाबतही चर्चा नको.

मात्र या प्रकाराला हिंदी-मराठी वादाचा रंग देणे चुकीचे आहे आणि ते नेहमीच चुकीचे राहील.

“मुंबई आसपास” समाजात अशा कुठल्याही विरोधाभासी प्रयत्नांमुळे जो वाद निर्माण होईल, त्याच्या विरोधात नेहमीच आवाज उठवत राहील.