Thursday, July 9, 2026
Latest:
सामाजिक

डोंबिवली येथे भारतीय मजदूर संघाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त गौरव रॅलीचे उत्साही आयोजन

सचिन शिंदे 

भारतीय मजदूर संघाच्या ७० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने डोंबिवली येथे भव्य गौरव रॅलीचे आयोजन करण्यात आले.

शनिवार, २६ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ४ ते ६ या डोंबिवली येथे भारतीय मजदूर संघाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त गौरव रॅलीचे उत्साही आयोजन ही रॅली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुतळा येथून सुरू होऊन कॅप्टन सच्चान स्मारक, घरडा सर्कल मार्गे छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा, डोंबिवली येथे उत्साहात संपन्न झाली.

भारतीय मजदूर संघ, ठाणे जिल्हा — 70 व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य सोहळा

या रॅलीत सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मजदूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “देशभक्त मजदूरो एक हो, राष्ट्रभक्त मजदूरो एक हो” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला. संघटनेचे कार्य व श्रमिक एकतेचा संदेश देण्यासाठी आणि संघाच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली होती. सर्व उपस्थितांनी एकतेचा उत्तम संदेश दिला.

भारतीय मजदूर संघाचा 70 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा – बँक शाखांमध्ये भगवान विश्वकर्मा पूजन व दीपप्रज्वलन

भारतीय मजदूर संघाचा मुख्य उद्देश फक्त मजदूर हक्कांसाठी संघर्ष न करता, राष्ट्रनिर्मितीमध्ये सक्रिय योगदान देणे आणि कामगारांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे हा आहे.

डोंबिवली नागरी सहकारी बँक ठाकुर्ली शाखेकडून शार्दूल विचारेचा सत्कार; CA फाउंडेशन परीक्षेत देशात तिसरा क्रमांक

७० वर्षांच्या या कार्ययात्रेला गौरव देण्यासाठी देशभरात विविध उपक्रम आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.