Friday, July 10, 2026
Latest:
सामाजिक

भारतीय मजदूर संघाचा 70 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा – बँक शाखांमध्ये भगवान विश्वकर्मा पूजन व दीपप्रज्वलन

डोंबिवली | 23 जुलै 2025
भारतीय मजदूर संघाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त आज डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या ठाकुर्ली कल्याण रोड शाखेसह सर्व शाखांमध्ये उत्साही वातावरणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

भारतीय मजदूर संघ, ठाणे जिल्हा — 70 व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य सोहळा

ठाकुर्ली शाखेत भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन नगर संघ चालक मा. श्री मुकुंद आत्माराम उपाध्ये (बाजी प्रभू नगर, डोंबिवली) यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बँकेतील सर्व कर्मचारी तसेच ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूजनानंतर दीपप्रज्वलन सोहळा पार पडला.

डोंबिवली नागरी सहकारी बँक ठाकुर्ली शाखेकडून शार्दूल विचारेचा सत्कार; CA फाउंडेशन परीक्षेत देशात तिसरा क्रमांक

मा. श्री उपाध्ये यांनी आपल्या भाषणात भारतीय मजदूर संघाची स्थापना, विचारधारा व कार्यपद्धती याबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, भारतीय मजदूर संघ हा देशातील सर्वात मोठा व सर्वसामान्य कामगारांच्या हितासाठी कार्य करणारा संघ आहे.

नाफा मराठी चित्रपट महोत्सवासाठी ‘बीएमएम’च्या ५७ महाराष्ट्र मंडळांचे सहकार्य

संपूर्ण डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या शाखांमध्ये वर्धापन दिन साजरा करताना कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात भारतीय संस्कृती, श्रमसंस्कार आणि कार्यनिष्ठा यांचे दर्शन घडले.