डोंबिवली नागरी सहकारी बँक ठाकुर्ली शाखेकडून शार्दूल विचारेचा सत्कार; CA फाउंडेशन परीक्षेत देशात तिसरा क्रमांक
डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या ठाकुर्ली-कल्याण रोड शाखेने आज ठाणे जिल्ह्याचा गौरव ठरलेल्या शार्दूल विचारे याचा सत्कार केला. शार्दूलने अलीकडेच जाहीर झालेल्या CA फाउंडेशन परीक्षेत संपूर्ण भारतात तिसरा क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
भारतीय मजदूर संघ, ठाणे जिल्हा — 70 व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य सोहळा
या गौरव सोहळ्यात शाखाधिकारी सौ. श्वेता अंबर्डेकर, ऑडिट विभाग प्रमुख श्री. वैभव जांदे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाजीप्रभू नगर शाखेचे माननीय संघचालक श्री. मुकुंद उपाध्ये उपस्थित होते. या वेळी शार्दूलला पुष्पगुच्छ व श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी यांच्या चरित्रग्रंथाचे स्मृतिचिन्ह म्हणून वितरण करण्यात आले.
“डोंबिवली नागरी सहकारी बँकेसाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण असून, शार्दूलसारख्या गुणवंत तरुणांना प्रोत्साहन देणे हे आमचे कर्तव्य आहे,” असे मत बँकेच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले.
नाफा मराठी चित्रपट महोत्सवासाठी ‘बीएमएम’च्या ५७ महाराष्ट्र मंडळांचे सहकार्य
शार्दूलला बँकेच्या वतीने पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. या सन्मान सोहळ्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, शार्दूलचे हे यश तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
