Thursday, June 25, 2026
Latest:
धर्म संस्कृती

मुंबई लोकल बनली धर्मांतर आणि भोंदूगिरीचा अड्डा; मुख्य सूत्रधारांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा जनआंदोलन! – हिंदु जनजागृती समितीचा रेल्वे प्रशासनाला थेट इशारा

मुंबई:

लाखो मुंबईकरांची ‘जीवनवाहिनी’ असलेली उपनगरीय रेल्वे (मुंबई लोकल) सध्या अत्यंत गंभीर आणि समाजविघातक कारवायांचे केंद्र बनत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पनवेल-सीएसएमटी मार्गावरील ‘एसी’ लोकलसह अन्य लोकल गाड्यांमध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून चालवली जाणारी छूपी ‘धर्मांतर मोहीम’ आणि राजरोसपणे सुरू असलेली ‘भोंदूगिरी’ यांमुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या प्रकारांची गंभीर दखल घेत ‘हिंदु जनजागृती समिती’ने थेट राज्याचे पोलीस महासंचालक, गृह विभाग आणि मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना सविस्तर निवेदन पाठवून कारवाईची मागणी केली आहे. या रॅकेटमागील मुख्य सूत्रधारांवर आणि बेकायदेशीर जाहिराती छापणाऱ्या मुद्रणालयांवर (छापखान्यांवर) तातडीने गुन्हे दाखल करावेत, अशी आग्रही मागणी समितीने केली आहे. तसेच प्रशासनाने पुढील १५ दिवसांत ठोस पावले न उचलल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही रेल्वे प्रशासनाला दिला आहे.

नियोजित रॅकेट आणि ‘ब्रेनवॉश’चा प्रयत्न

रेल्वे डब्यांमध्ये प्रवाशांच्या भावनिक आणि मानसिक कोंडीचा गैरफायदा घेत धर्मांतराचे अत्यंत नियोजनबद्ध जाळे विणले जात असल्याचा आरोप समितीने केला आहे. लोकलच्या डब्यांमध्ये ‘जीवनारेखा हवी आहे का?’, ‘येशू देव आहे’, अशा भावनिक मथळ्यांची पत्रके चिकटवून नैराश्यग्रस्त किंवा अडचणीत असलेल्या प्रवाशांचे पद्धतशीरपणे ‘ब्रेनवॉश’ केले जात आहे. या जाहिरातींवर ‘ThisLoveStory.org’ सारख्या संकेतस्थळांचे (वेबसाइट्स) पत्ते देऊन प्रवाशांना धर्मांतराच्या जाळ्यात ओढण्याचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. सार्वजनिक मालमत्तेचा असा उघड गैरवापर अत्यंत संतापजनक असल्याचे समितीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

धार्मिक द्वेषातून हिंदू देवतांची विटंबना करणाऱ्या ख्रिश्चन नर्सवर गुन्हा दाखल; तात्काळ अटकेची हिंदु जनजागृती समितीची मागणी

चंगाई सभा’ आणि बंगाली बाबांचा सुळसुळाट

धर्मांतर मोहिमेसोबतच लोकलच्या डब्यांमध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या जाहिरातींचा सुळसुळाट झाला आहे. ख्रिश्चन मिशनरी फादरच्या ‘चंगाई सभां’चे पोस्टर्स लावून केवळ प्रार्थनेने कॅन्सरसारखे गंभीर आजार बरे करण्याचे अशास्त्रीय दावे केले जात आहेत. याशिवाय, ‘१००% वशीकरण’ आणि ‘प्रेम प्रकरण नीट करून देणारे बंगाली बाबा’ अशा फसव्या जाहिरातींद्वारे प्रवाशांची आर्थिक लूट सुरू आहे. जादूटोणा विरोधी कायद्यानुसार हे सर्व अजामीनपात्र गुन्हे असूनही रेल्वे प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गौ माता’ वर काँग्रेसचे ‘हृदयपरिवर्तन’ की निवडणुकीचा ढोंग? तावडेंच्या ‘साहित्यिक प्रहारा’मुळे अजय राय बॅकफुटवर!

श्वेतपत्रिका काढण्याची आणि व्हॉट्सॲप हेल्पलाइनची मागणी

या संपूर्ण प्रकरणावर बोलताना हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले की,

“या समस्येवर केवळ वरवरचे उपाय न करता आता मुळावर घाव घालण्याची आवश्यकता आहे. प्रवाशांना अशा प्रकारांची तातडीने तक्रार करता यावी यासाठी रेल्वेने स्वतंत्र ‘व्हॉट्सॲप हेल्पलाइन’ सुरू करावी. तसेच रेल्वेने साध्या वेशातील विशेष पथके नेमून या समाजकंटकांना रंगेहाथ पकडले पाहिजे.”

घनवट यांनी पुढे मागणी केली की, जाहिरातींवरील फोन नंबर आणि वेबसाइटचा सायबर पोलिसांमार्फत सखोल तपास करून यामागे असलेल्या संस्था, फादर आणि भोंदूबाबांवर थेट गुन्हा (FIR) दाखल करावा. अशा समाजविघातक जाहिराती छापणाऱ्या छापखान्यांचा शोध घेऊन त्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत. तसेच, गेल्या पाच वर्षांत अशा अनधिकृत जाहिरातींवर रेल्वे प्रशासनाने नेमकी काय कारवाई केली, याची ‘श्वेतपत्रिका’ रेल्वेने सार्वजनिक करावी, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली आहे.