नाफा मराठी चित्रपट महोत्सवासाठी ‘बीएमएम’च्या ५७ महाराष्ट्र मंडळांचे सहकार्य
अमेरिकेतील मराठी चित्रपट सृष्टीला चालना देण्यासाठी ‘नाफा’ (NAFA) द्वारे आयोजित करण्यात आलेल्या मराठी चित्रपट महोत्सवाला मोठा प्रतिसाद लाभत आहे. विशेष म्हणजे, या महोत्सवासाठी अमेरिकेतील ‘ब्रिऊह ऑफ मराठी मंडळ्स’ (BMM) या प्रमुख संस्थेच्या ५७ महाराष्ट्र मंडळांचे सहकार्य लाभले आहे.
या तीन दिवसीय भव्य महोत्सवात चित्रपट क्षेत्रातील विविध पैलूंवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नवोदित कलाकार, तंत्रज्ञ आणि रसिकांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे. यासोबतच महोत्सवाच्या सर्व तीन दिवशी ‘चित्रपट एक्स्पो’ चे आयोजन करण्यात आले आहे, जे उपस्थितांसाठी आकर्षण ठरणार आहे.
सांस्कृतिक मंत्री अॅड. आशिष शेलार यांना ‘नाफा’ मराठी चित्रपट महोत्सवाचे विशेष आमंत्रण
मराठी चित्रपटसृष्टीचा जागतिक स्तरावर विस्तार आणि नव्या संधी निर्माण करणे, हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश असून ‘नाफा’चा हा उपक्रम मराठी सांस्कृतिक मूल्यांचा जागतिक प्रसार करण्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे.
