भिवंडी निजामपूर महापालिका अग्निशमन दलाच्या ताफ्यात दोन लहान अग्निरोधक वाहनांचा समावेश
मुंबई दि.२५ :- भिवंडी निजामपूर महापालिका अग्निशमन दलाच्या ताफ्यात दोन लहान अग्निरोधक वाहने दाखल झाली आहेत. या वाहनांमुळे अग्निशमन दलाच्या जवानांना दाटीवाटीच्या ठिकाणी पोहोचून आग शमविणे शक्य होणार आहे.
ठाणे महापालिका शिक्षण विभागातर्फे १९ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार
भिवंडी निजामपूर महापालिका अग्निशमन दलातील एकूण वाहनांची संख्या आता आठ झाली आहे. महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गोदामे आणि दाटीवाटीची वस्ती आहे. येथून अवजड वाहतूकही सुरू असते.
दसऱ्याच्या मूहूर्तावर मुंबईत ९ हजार ५७२ वाहनांची नोंदणी
एखाद्या ठिकाणी आग लागल्यास आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दल तातडीने पोहोचू शकत नाही. अग्नीशमन दलाची मोठी वाहने वाहतूक कोंडीत अडकून पडतात तर काही वेळेस दाटीवाटीच्या वस्तीतून वाहन जाऊ शकत नाही. महापालिकेने जिल्हा नियोजन समितीच्या मंजूर वार्षिक निधीतून दोन लहान अग्निरोधक वाहने खरेदी केली आहेत. या दोन वाहनांची किंमत ८६ लाख रुपये आहे.