ठाणे खाडीवरील पादचारी पुलामुळे प्रवासी, नागरिकांना दिलासा
ठाणे दि.२५ :- ठाणे खाडीवर विटावा ते चेंदणी कोळीवाडा दरम्यान उभारण्यात आलेल्या पादचारी पुलामुळे कळवा, विटावा आणि दिघा भागातील रहिवाशांना आता सुरक्षितपणे ठाणे रेल्वे स्थानक गाठता येणार आहे. यामुळे हजारो प्रवासी, नागरिक यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
भिवंडी निजामपूर महापालिका अग्निशमन दलाच्या ताफ्यात दोन लहान अग्निरोधक वाहनांचा समावेश
कळवा, विटावा आणि दिघा भागातील नागरिकांना ठाणे स्थानकात येण्यासाठी २० ते २५ मिनीटांचा प्रवास करावा लागत होता. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना वाटावा येथून रेल्वे मार्गातून चालत येऊन ठाणे स्थानकात यावे लागायचे.
ठाणे महापालिका शिक्षण विभागातर्फे १९ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) २० एप्रिल २०१७ मध्ये विटावा ते ठाणे दरम्यान पुलाच्या उभारणीस सुरूवात झाली. दोन वर्षांत हा पूल बांधून पूर्ण होणे अपेक्षित होते. मे २०२३ मध्ये पूलाची कामे पूर्ण झाली. या पादचारी पुलासाठी २४ कोटी ५५ लाख रुपये खर्च आला आहे.