सनातन धर्माच्या रक्षणासाठी ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियान
मुंबई दि.०७ :- सनातन धर्माच्या रक्षणासाठी आणि सनातन धर्म नष्ट करण्याविषयी ‘हेटस्पीच’ करणार्यांच्या विरोधात ‘मी सनातन धर्मरक्षक’ हे अभियान सर्वत्र राबविण्यात येणार आहे, अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी दिली.
ठाणे जिल्हा माहिती कार्यालयही व्हॉटसॲप चॅनेलवर
अभियानात सनातन धर्मियांत जागृती करणारी व्याख्याने, बैठका आयोजित केल्या जाणार आहेत. ‘हेटस्पीच’ करणार्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्याचे काम केले जाणार आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.