कँनडास्थित डोंबिवलीकर डॉ मैथिली भोसेकर ‘मिस इंटरनॅशनल वर्ल्ड पेटिट’ ची मानकरी
डोंबिवली, दि. ८
फ्लोरिडा येथे झालेल्या सौंदर्य स्पर्धेत मूळच्या डोंबिवलीकर असलेल्या डॉ. मैथिली भोसेकर या विजयी झाल्या असून त्यांनी “मिस इंटरनॅशनल वर्ल्ड पेटिट २०२२-२०२३” हा किताब पटकाविला.
कँनडास्थित डोंबिवलीकर डॉ मैथिली भोसेकर
‘मिस इंटरनॅशनल वर्ल्ड पेटिट’ ची मानकरी
डॉ. मैथिली यांची पॅरिस फॅशन वीकसाठी सिग्नेचर मॉडेल म्हणून निवड झाली होती. हायटेक मोडा निर्मित TIGP कटुर या डिझायनर ब्रँड साठी मैथिली ने Le Salon des Miriors या ठिकाणी मॉडेल म्हणून कामगिरी बजावली.
डॉ. मैथिली दतशल्यविशारद असून मॉडेलिंग हे आवड म्हणून जोपासले आहे.
या स्पर्धेसाठी धी इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अक्षता प्रभू यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.
——-