वाहतूक दळणवळण

चेअर कार आणि ‘एक्झिक्युटिव्ह’ श्रेणीच्या प्रवासीभाडय़ात २५ टक्क्यांपर्यंत कपात

अनुभूती, व्हिस्टाडोम’ डब्यांसह वातानुकूलित आसनांना लागू
मुंबई, दि. १०
‘अनुभूती’ आणि ‘व्हिस्टाडोम’ डब्यांसह वातानुकूलित आसन व्यवस्था असलेल्या रेल्वे गाडय़ांच्या चेअर कार आणि ‘एक्झिक्युटिव्ह’ श्रेणीच्या प्रवासीभाडय़ात २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने घेतला आहे. ही सवलत एका वर्षांसाठी लागू असेल, मात्र सुट्टी/उत्सव विशेष रेल्वे गाडय़ांना ती लागू होणार नाही.

उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, पुढील आदेशापर्यंत ‘मशाल’ हे चिन्ह वापरण्यास परवानगी
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून सध्या तीन ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ धावत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर या तिन्ही गाडय़ांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या गाड्यांना ही कपात लागू असणार नाही.

‘आयएनएस वजीर’ पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल

रेल्वे मंडळाने गेल्या ३० दिवसांत प्रवाशांचा ५० टक्क्यांपेक्षा कमी प्रतिसाद मिळालेल्या रेल्वे गाडय़ांमधील भाडे कमी करण्याचे आदेश रेल्वे विभागांना दिले आहेत. त्यानुसार प्रामुख्याने कमी अंतराच्या रेल्वे गाडय़ांच्या भाडय़ात सूट दिली जाणार आहे. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चे दर कमी होणार आहेत.

५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ही सवलत तात्काळ लागू होणार असून मात्र या निर्णयाआधी आरक्षण केलेल्या प्रवाशांना परतावा दिला जाणार नाही, असे रेल्वे मंडळाने स्पष्ट केले आहे. आरक्षण शुल्क, सुपरफास्ट अधिभार आणि जीएसटीचे दर पूर्वीप्रमाणेच राहतील, त्यात सवलत मिळणार नसल्याचे रेल्वे मंडळाने म्हटले आहे.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *