विडी कामगार संघाच्या प्रयत्नातून विडी कामगारांना भविष्य निर्वाह निधी प्राप्त
मुंबई, दि. १०
महाराष्ट्र राज्य विडी कामगार संघाच्या (संलग्न भारतीय मजदूर संघ) प्रयत्नातून विडी कामगारांना भविष्य निर्वाह निधीची रक्कम प्राप्त झाली आहे. ही रक्कम १७ लाख ३३ हजार इतकी आहे.
पुणे येथील ठाकुर सावदेकर आणि कंपनी येथे विडी उत्पादनाचे काम चालते. सुमारे अडीचशेहून जास्त कामगार येथे विडी बनविण्याचे काम करतात. यापैकी फक्त काही कामगारांनाच भविष्य निर्वाह निधीचे अंशदान सुरू होते. ७८ कामगार भविष्य निर्वाह निधीच्या पायथ्यापासून वंचित होते.
भारतातील घुसखोरांविषयी कठोर पावले उचलली नाहीत तर भारताचा ‘फ्रान्स’ होईल – अनिल धीर यांचा इशारा
महाराष्ट्र राज्य विडी कामगार संघाने ही बाब व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिली पण व्यवस्थापनाने कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे संघाने पुणे येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे तक्रार दाखल केली. कार्यालयातील अधिका-यांनी चौकशी करून भविष्य निर्वाह आयुक्त- पुणे यांना अहवाल सादर केला.
भारतीय मजदूर संघ रायगड जिल्ह्याची तहसीलदार कार्यालय समोर महागाई विरोधात निदर्शने.
भविष्य निर्वाह निधी कायदातील तरतूदी नुसार १७ लाख ३३ हजार १०७ रूपये इतकी देय रक्कम नियोक्त्यांकडून निश्चीत केली. तसेच व्याज आणि दंडाची रक्कम ४५ दिवसांत जमा करण्याचे आदेश दिले. भारतीय मजदूर संघाचे सचिव उमेश विस्वाद यांनी कामगारांची बाजू मांडली.
—–