सीमेवरील सैनिकांसाठी दिवाळी फराळ पाठवण्याचे भारत विकास परिषदेचे आवाहन

डोंबिवलीकरांना जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे अमित दातार यांचे आवाहन
डोंबिवली: देशाच्या सीमांचे रात्रं-दिवस रक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांसोबत आनंदाचा सण साजरा करण्यासाठी ‘भारत विकास परिषद – हुतात्मा कॅप्टन विनयकुमार सचन डोंबिवली शाखा’ (मुंबई कोकण प्रांत) यांच्या वतीने विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या उपक्रमांतर्गत सीमेवर कडाक्याच्या थंडीत तैनात असलेल्या सैनिकांना दिवाळी फराळ पाठवण्यात येणार आहे.
या उपक्रमाची सविस्तर माहिती देणयाचे आवाहन भारत विकास परिषदेचे डोंबिवलीतील कार्यकर्ते अमित दातार यांनी केले असून, या सामाजिक आणि देशप्रेमाच्या कार्यात डोंबिवलीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सैनिकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करावी, असे विशेष आवाहन त्यांनी केले आहे.
कल्याणचे सामाजिक कार्यकर्ते सदाशिव चव्हाण यांना दिल्लीत ‘संत ईश्वर सन्मान २०२६’ प्रदान
उपक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये व योगदानाची माहिती:
आयोजक संस्था: भारत विकास परिषद, हुतात्मा कॅप्टन विनयकुमार सचन डोंबिवली शाखा (मुंबई कोकण प्रांत).
योगदान रक्कम: एका फराळ डब्यासाठी ₹ ५००/- (किंवा ₹ ५००/- च्या पटीत) देणगी देऊन नागरिक या उपक्रमात सहभाग नोंदवू शकतात.
८०G कर सवलत: या उपक्रमासाठी दिलेल्या देणगीवर आयकर कायदा कलम 80G अंतर्गत कर सवलत उपलब्ध आहे.
देणगी जमा करण्याची पद्धत:
QR Code द्वारे: पत्रकावर दिलेल्या QR कोडचा वापर करून डिजिटल पद्धतीने थेट देणगी जमा करता येईल.
धनादेश (Cheque) द्वारे:
धनादेश ‘भारत विकास परिषद मुंबई कोकण प्रांत’ या नावाने काढावा.
टीप: धनादेशाच्या मागच्या बाजूस आपले नाव, संपूर्ण पत्ता, पॅन कार्ड क्रमांक (PAN) आणि संपर्क क्रमांक लिहिणे आवश्यक आहे.
संपर्क आणि अधिक माहितीसाठी:
उपक्रमात सहभागी होण्यासाठी किंवा देणगीबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे: 📞 9892258923 | 9167744049 | 9819039085 | 9821870770
आपल्या वीर सैनिकांपर्यंत दिवाळीचा गोडवा पोहोचवण्यासाठी सर्व डोंबिवलीकरांनी पुढे येऊन या उपक्रमाला भरभरून सहकार्य करावे, अशी विनंती भारत विकास परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

माता-बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘हजार दिवसांचे बाल्यावस्था विकास मिशन’