सामाजिक

डोंबिवलीत आज आणि रविवारी ‘आनंदवन ग्राहक भेट’ प्रदर्शनाचे आयोजन

डोंबिवलीत ३ आणि ४ ऑक्टोबरला ‘आनंदवन ग्राहक भेट’ प्रदर्शनाचे आयोजन

कौस्तुक व पल्लवी आमटे यांची असणार विशेष उपस्थिती

डोंबिवली: पद्मश्री डॉ. बाबा आमटे यांच्या प्रेरणादायी कार्यातून साकारलेल्या आनंदवनातील कष्टकरी हातांनी तयार केलेल्या विविध वस्तू नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डोंबिवलीत ३ आणि ४ ऑक्टोबर रोजी ‘आनंदवन ग्राहक भेट’ या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

महारोगी सेवा समितीच्या पुढाकाराने ‘ब्राह्मण ब्रीझ नेटवर्क असोसिएशन’ आणि ‘डोंबिवली ब्राह्मण उद्योजक प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त सहकार्याने हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे.

माता-बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘हजार दिवसांचे बाल्यावस्था विकास मिशन’

वेळ आणि ठिकाण

दिनांक: शनिवार, ३ ऑक्टोबर आणि रविवार, ४ ऑक्टोबर

वेळ: सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत

ठिकाण: ब्राह्मण सभा सभागृह, टिळक रोड, डोंबिवली (पूर्व)

प्रवेश: सर्वांसाठी मोफत प्रवेश

प्रदर्शनाची वैशिष्ट्ये आणि प्रमुख आकर्षणे

आनंदवनातील उत्पादने: आनंदवनातील कष्टकरी व्यक्तींनी तयार केलेल्या विविध गृहोपयोगी वस्तू आणि उत्पादनांचे प्रदर्शन हे या उपक्रमाचे मुख्य आकर्षण असणार आहे.

स्थानिक व्यावसायिकांना प्रोत्साहन: घरातून व्यवसाय करणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांसाठीही येथे विविध विक्री दालनांची (स्टॉल्स) व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना विविध उत्पादने व सेवांची माहिती एकाच छताखाली मिळेल आणि स्थानिक उद्योजकांना ग्राहकांशी थेट संवाद साधण्याची संधी लाभेल, अशी माहिती सौ. उमा प्रभुदेसाई यांनी दिली.

सामाजिक संदेश: आनंदवनाच्या कार्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासोबतच सामाजिक बांधिलकी, कष्टाची प्रतिष्ठा आणि स्वावलंबनाचा संदेश देणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे.

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टच्या १३ व्या साप्ताहिक बैठकीत वरिष्ठ पत्रकार मिलिंद भागवत यांचे विशेष मुलखत

कौस्तुक व पल्लवी आमटे यांची उपस्थिती आणि मुलाखत

प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी डॉ. बाबा आमटे यांचे नातू कौस्तुक आमटे आणि त्यांच्या पत्नी सौ. पल्लवी आमटे विशेष उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनानंतर त्यांची एक विशेष मुलाखतही आयोजित करण्यात आली आहे.

डोंबिवलीकरांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन आनंदवनातील कष्टकरी हातांना पाठबळ द्यावे आणि स्थानिक घरगुती व्यावसायिकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सौ. सुनैना पतकी यांनी केले आहे.