५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांची पोलीस आयुक्तांना सूचना
मुंबई दि.१८ :- दुपारच्या उन्हात कर्तव्य बजाविणाऱ्या वाहतूक पोलिसांना सावलीसाठी तात्पुरत्या शेडस तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे. ५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना केल्या.
भाजप मनसेचे बिनसले की फडणविशी ‘राज’कीय नाटक
काल दुपारी साडेबारा वाजता मुख्यमंत्री शिंदे ठाणे येथून मुंबईकडे मार्गक्रमण करत असताना भर उन्हात जागोजागी कर्तव्य बजावित असलेले वाहतूक पोलीस त्यांना दिसले. यातील अनेक पोलीस हे वयाने ज्येष्ठ असूनही भर उन्हात कर्तव्य बजावत असल्याचे त्यांनी पाहिले.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या देशभरातील शाखांमध्ये सायबर फसवणुकीच्या प्रकारांत वाढ
मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांची अवस्था पाहून तातडीने बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्ता विवेक फणसळकर यांना दूरध्वनी केला आणि यापुढे ५५ वर्षांवरील वाहतूक पोलिसांना भर उन्हात रस्त्यावर कर्तव्य बजाविण्यासाठी तैनात करू नये, असे सांगितले.