मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा आता २३ टक्के,
पुढील दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा
– तलावक्षेत्रात जोरदार पाऊस पडण्याची गरज
मुंबई, दि. १०
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठ्यात दररोज थोडी वाढ होत आहे. सातही तलावातील एकूण पाणीसाठा रविवारी २३ टक्के झाला असून तो पुढील दोन ते अडीच महिने पुरेल इतका आहे
खासगी विकासकाच्या खोदकामामुळे मागाठाणे मेट्रो स्थानकालगतचा रस्ता खचला
पावसाबरोबरच जमिनीतून झिरपणाऱ्या पाण्यामुळेही पाणीसाठ्यात वाढ होत असली तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा कमीच आहे.
विद्याविहार रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम येत्या ३० सप्टेंबर २०२३पर्यंत पूर्ण होणार
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या तलावातून दररोज ३ हजार ८०० दशलक्षलीटर पाण्याचा पुरवठा केला जातो.
भारतातील घुसखोरांविषयी कठोर पावले उचलली नाहीत तर भारताचा ‘फ्रान्स’ होईल – अनिल धीर यांचा इशारा
तलाव पूर्ण भरलेले असतात तेव्हा या सर्व तलावातील पाणीसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटर इतका असतो. सध्या सर्व तलावातील पाणीसाठा ३ लाख ३४ हजार ५२९ दशलक्षलीटर इतका आहे.
एसएनडीटी विद्यापीठाने विद्यार्थिनींमध्ये उद्यमशीलता रुजवावी- राज्यपाल रमेश बैस
१ ऑक्टोबरपर्यंत सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले असतील तर हे पाणी वर्षभर व्यवस्थित पुरते. त्यामुळे पुढचे तीन महिने धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडणे गरजेचे आहे.
———–
