छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडित ऐतिहासिक वस्तूंचे संकलन करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शिवविचारांचा जागर करण्यासाठी वर्षभर राज्यभरात कार्यक्रम
मुंबई, दि. २
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा काळातील ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी जगभरात असलेले शिवकालिन साहित्य आणि वस्तूंचे सांस्कृतिक कार्य विभागातर्फे संकलन करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल येथे केले.
पर्यटनाला चालना देणाऱ्या विविध प्रकल्पांना शिखर समितीची मान्यता
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याचा प्रारंभ गेट वे ऑफ इंडिया येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
पंढरीच्या आषाढी वारीसाठी येणाऱ्या वाहनांना परतीच्या प्रवासासह टोल माफ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे आणि जगदंबा तलवार पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार वाघनखे दर्शनासाठी देण्याचे ब्रिटन सरकारने मान्य केले आहे.
शिवराज्याभिषेक दिनासाठी रायगडावर चांदीची पालखी रवाना
याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या सेनापतींवर आधारित टपाल तिकिटांचे प्रकाशन या कालावधीत व्हावे, असा प्रयत्न सुरु आहे. त्याचे नियोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरील सर्वोत्कृष्ट दहा चित्रपटांचा महोत्सव आयोजित करण्यात येईल.
रायगड किल्ल्यावर उद्या शिवराज्याभिषेकदिन सोहळा
या वेगवेगळ्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यात येतील, शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्य शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या पुढाकाराने गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात शिवकालिन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. त्याचेही उदघाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट
या प्रदर्शनात तलवार, पट्टा, कट्यार, गुर्ज, भाला, खंजीर, चिलखत, गुप्ती, बंदूक अशी जुन्या काळातील चारशेहून अधिक शस्त्रे नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. हे प्रदर्शन येत्या ६ जूनपर्यंत गेट वे ऑफ इंडिया येथे पाहता येणार आहे.
——–
