ठळक बातम्या

शिवराज्याभिषेक दिनासाठी रायगडावर चांदीची पालखी रवाना

मुंबई दि.३१ :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे यंदा (२ जून) ३५० वे वर्ष आहे. श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीच्यावतीने दुर्गराज रायगड संस्था तेथे गेल्या अनेक वर्षांपासून हा सोहळा साजरा करत आहे. यंदाच्या सोहळ्यासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी चांदीच्या पत्र्याने सुशोभित केलेली पालखी संस्थेकडे सुपूर्द केली.

स्वित्झर्लंड भारताशी मुक्त व्यापार करण्यास उत्सुक- राजदूत डॉ. राल्फ हेकनर

मंगळवारी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यासमोर पालखीमध्ये छत्रपती शिवरायांची प्रतिमा ठेवून पूजा करण्यात आली. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडे आम्ही पालखीची मागणी केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर हे शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहाणारे भक्त होते, असे समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी सांगितले.

सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या संकेतस्थळावर कारवाई करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी पालखी आणि त्यातील शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन केले. कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्निल सावरकर यांनी पालखी वाहून नेण्याचा प्रातिनिधीक मान स्वीकारला. स्मारकाचे कर्मचारी, सदस्यही यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *