अयोध्या येथे ‘ऑल इंडिया को-ऑप बँक एम्प्लॉईज ऑर्गनायझेशन’चे पहिले ऐतिहासिक अधिवेशन संपन्न; राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रकाश खाडिलकर यांची बिनविरोध निवड!
अयोध्या येथे ‘ऑल इंडिया को-ऑप बँक एम्प्लॉईज ऑर्गनायझेशन’चे पहिले ऐतिहासिक अधिवेशन संपन्न; राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रकाश खाडिलकर यांची बिनविरोध निवड!
सचिन शिंदे
अयोध्या: भारतीय मजदूर संघ प्रणित ‘ऑल इंडिया को-ऑप बँक एम्प्लॉईज ऑर्गनायझेशन’ (All India Co-op Bank Employees Organisation) चे पहिले राष्ट्रीय अधिवेशन ०३ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रभू श्रीरामांची नगरी अयोध्या येथे अतिशय उत्साहात पार पडले. देशभरातील सहकारी बँकिंग क्षेत्रातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना एकाच छताखाली आणण्याच्या दृष्टीने हे अधिवेशन अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले.
या अधिवेशनाला महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तराखंड, झारखंड, हरियाणा आणि राजस्थान अशा सुमारे १५ हून अधिक राज्यांतील तब्बल ३५० प्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.
सहकारी बँका आणि कर्मचाऱ्यांच्या हितार्थ १३ महत्त्वाचे प्रस्ताव संमत अधिवेशनात सहकारी बँकिंग क्षेत्राचे सक्षमीकरण आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सखोल चर्चा झाली. या वेळी एकमुखाने १३ महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने पुढील मागण्यांचा समावेश आहे:
आयकर मुक्ती: सहकारी बँकांच्या नफ्यावर (प्रॉफिट) लादण्यात आलेला आयकर त्वरित रद्द करण्यात यावा.
निवृत्तीचे वय: सहकारी बँकांमधील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यात यावे.
दुहेरी SLR चे ओझे: सहकारी बँकांवर असलेले दुहेरी एस.एल.आर. (SLR) चे बर्डन हटवण्यात यावे.
किमान पेन्शन वाढ: कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत न्यूनतम पेन्शन दरमहा रु. ७,५००/- करण्यात यावी.
सीमेवरील सैनिकांसाठी दिवाळी फराळ पाठवण्याचे भारत विकास परिषदेचे आवाहन
पहिली ३० सदस्यांची राष्ट्रीय कार्यकारणी गठीत संघटनेचे कामकाज देशभरात प्रभावीपणे चालवण्यासाठी ३० सदस्यांची पहिली राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात डोम्बिवली नागरी सहकारी बँकेत (DNS Bank) कार्यरत असणारे प्रकाश खाडिलकर यांची ‘ऑल इंडिया को-ऑप बँक एम्प्लॉईज ऑर्गनायझेशन’च्या प्रथम राष्ट्रीय अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
संघटनेची पुढील रूपरेषा आणि आगामी वाटचाल निश्चित करण्यासाठी या नवनिर्वाचित कार्यकारणीची पहिली अधिकृत बैठक डिसेंबर २०२६ मध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेत अधिवेशनाची यशस्वी सांगता झाली.

