उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, पुढील आदेशापर्यंत ‘मशाल’ हे चिन्ह वापरण्यास परवानगी
वृत्तसंस्था
नवी दिल्ली दि.२७ :- उद्धव ठाकरे गटाला सोमवारी सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता दिलासा मिळाला. ठाकरे गटाला पुढील आदेशापर्यंत ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह म्हणून वापरण्याची मुभा मिळाली आहे. मशाल चिन्हावर दावा करणारी समता पार्टीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
धावत्या उपनगरी गाडीत ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून मुकबधीर तरुणाला जाळण्याचा प्रयत्न
शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबईच्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल हे चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आले होते. त्याची मुदत २७ मार्च रोजी संपणार होती.
मुंबई सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला लवकरच कल्याणला थांबा मिळणार
त्यापूर्वीच समता पार्टीने मशाल या चिन्हावर दावा करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत मशाल हे चिन्ह उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.