मुंबई सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला लवकरच कल्याणला थांबा मिळणार
मुंबई दि.२७ :- मुंबई सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला लवकरच कल्याणला थांबा देण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंंत्री कपिल पाटील यांनी दिली. महाराष्ट्रात दोन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्या असून त्यापैकी मुंबई शिर्डी एक्स्प्रेसला कल्याण येथे सुरुवातीपासून थांबा देण्यात आला आहे.
धावत्या उपनगरी गाडीत ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून मुकबधीर तरुणाला जाळण्याचा प्रयत्न
मात्र मुंबई सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला कल्याण येथे थांबा देण्यात आला नव्हता आणि तो मिळावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. रेल्वे प्रशासनाने मुंबई सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला कल्याणला थांबा देण्याबाबत सकारात्मकता दर्शविली असून लवकरच कल्याणला थांबा मिळणार असून याचा फायदा कल्याणसह ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांना होणार आहे.
