गुन्हे-वृत

धावत्या उपनगरी गाडीत ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून मुकबधीर तरुणाला जाळण्याचा प्रयत्न

मुंबई दि.२६ :- धावत्या उपनगरी गाडीत एका मूकबधीर तरुणाच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्यला जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण उपनगरी गाडीत कळवा-मुंब्रा स्थानकादरम्यान घटना घडली.

गुजरात येथून आलेल्या स्वच्छता यात्रेकडून बृहन्मुंबई महापालिकेच्या कामांचे कौतुक

प्रमोद वाडेकर असे या तरुणाचे नाव आहे. नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या ज्वलनशील द्रवपदार्थाने या मुकबधीर व्यक्तीला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत तरुणाचा हात भाजला असून त्याला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपंग व्यक्तींना सहानुभूती नको तर सहकार्य मिळणे गरजेचे- राज्यपाल रमेश बैस

प्रमोद मुंबईतील एका हॉटेलमध्ये काम करतो. कामावरून दिव्याला घरी परतत असताना मुंब्रा स्थानकाजवळ अपंग डब्यामध्ये एका अज्ञात इसमाने प्रमोदच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्याला जाळण्याचा प्रयत्न केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *