डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती; चैत्यभूमीवर पुरविण्यात येणा-या सुविधांचा आढावा घेण्यासाठी बैठक
मुंबई दि.२७ :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई महापालिकेतर्फे चैत्यभूमी येथे पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा आढावा घेण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, पुढील आदेशापर्यंत ‘मशाल’ हे चिन्ह वापरण्यास परवानगी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, महापालिका आयुक्त आय एस चहल, समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे आदि यावेळी उपस्थित होते.