Uncategorized

जलवाहिन्या कार्यान्वित करण्याच्या कामासाठी ठाणे आणि परिसरात दोन दिवस पाणी पुरवठा बंद

ठाणे दि.२२ :- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत नवीन जलवाहिन्या टाकल्या असून त्या तातडीने कार्यान्वित करण्याचे काम येत्या २४ मार्च रोजी दुपारी १२ ते २५ मार्च रोजी दुपारी १२ या वेळेत करण्यात येणार आहे. या कालावधीत ठाणे शहराला होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

‘म्हाडा’ कोकण मंडळाच्या घरांसाठी ४ हजार ७८४ अर्ज दाखल

दिवा, कळवा, मुंब्रा येथील वाय जंक्शन ते मुंब्रा अग्निशमन दल परिसर, वागळे इस्टेट परिसरातील रुपादेवी पाडा, किसननगर क्रमांक- २, नेहरुनगर तसेच मानपाडा भागातील कोलशेत खालचा गाव या भागांचा पाणी पुरवठा २४ तासासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.

कर्तव्य पथावरील संचलनातील महाराष्ट्राच्या कलावंतांची कामगिरी गौरवस्पद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. या पाणी कपातीच्या कालावधीत पाणी जपून वापरावे, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *