संस्कृती आणि परंपरा टिकविण्यासाठी सण, उत्सव महत्वाचे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
डोंबिवली, कल्याणमध्ये नववर्ष स्वागत यात्रा उत्साहात
डोंबिवली दि.२२ :- संस्कृती, परंपरा टिकविण्यासाठी सण, उत्सव महत्वाचे आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज डोंबिवली येथे केले. श्री गणेश मंदिर संस्थान आणि नववर्ष स्वागत यात्रा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे डोंबिवलीत आले होते. डोंबिवली पूर्व येथील इंदिरा चौक ते गणेश मंदिर दरम्यान मुख्यमंत्री स्वागत यात्रेत पायी चालले. त्यानंतर सहभागी नागरिकांसमोर ते बोलत होते. डोंबिवली नववर्ष स्वागत यात्रेचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष आहे.
‘म्हाडा’ कोकण मंडळाच्या घरांसाठी ४ हजार ७८४ अर्ज दाखल
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रमोद पाटील, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, मंदिराच्या अध्यक्षा अलका मुतालिक, विश्वस्त राहुल दामले, प्रवीण दुधे, आदी यावेळी उपस्थित होते.

स्वागत यात्रेच्या माध्यमातून लोक आनंदाने रस्त्यावर उतरली असून निर्बंधमुक्त सण, उत्सव साजरे केले तर लोक त्याचा आनंद घेतात. आणि म्हणून शिवसेना-भाजपचे सरकार गेल्या वर्षी सत्तारुढ होताच सण, उत्सव साजरे करण्यावरील निर्बंध आम्ही हटविले, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
कर्तव्य पथावरील संचलनातील महाराष्ट्राच्या कलावंतांची कामगिरी गौरवस्पद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
श्री गणेश मंदिर संस्थान लवकरच शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे. मंदिराच्या वतीने धार्मिक कार्यक्रमांबरोबरच अनेक सामाजिक उपक्रमही राबविले जातात. मंदिराचा शतकोत्त्तर महोत्सवात मंदिर संस्थानला काही कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. दरम्यान ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना घेऊन येथील श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे काढण्यात आलेल्या नववर्ष स्वागत यात्रेत पर्यावरणाचा जागर करण्यात आला. निसर्ग, पर्यावरण संवर्धनाचे संदेश देणारे आकर्षक चित्ररथ स्वागत यात्रेत होते. डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदान येथून सकाळी साडेसहा वाजता सूरू झालेल्या स्वागत यात्रेचा समारोप डोंबिवली पूर्व भागात आप्पा दातार चौकात झाला.
कल्याण संस्कृती मंचतर्फे आयोजित नववर्ष स्वागत यात्रेत नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते. कल्याण पूर्व, डोंबिवली ग्रामीण भागात उप स्वागत यात्रा काढण्यात आल्या होत्या. परिसरातील नागरिक या यात्रांमध्ये सहभागी झाले होते. स्वातंत्र्याची ७५ वर्ष ही संकल्पना घेऊन कल्याण संस्कृती मंचतर्फे स्वागत यात्रेचे आयोजन केले होते. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात देशाने विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, सामरिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे देखावे चित्ररथांच्या माध्यमातून वाहनांवर उभारण्यात आले होते.
