ठळक बातम्या

‘म्हाडा’ कोकण मंडळाच्या घरांसाठी ४ हजार ७८४ अर्ज दाखल

मुंबई दि.२२ :- ‘म्हाडा’ कोकण मंडळाच्या ४ हजार ६५४ (१४ भूखंडासह) घरांसाठी २१ मार्चपर्यंत अनामत रक्कमेसह ४ हजार ७८४ अर्ज सादर झाले आहेत. कोकण मंडळाच्या २ हजार ६०६ घरांसाठी ८ मार्चपासून अर्ज विक्री – स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ योजनेतील २ हजार ०४८ घरांसाठी १७ मार्चपासून अर्ज विक्री-स्वीकृती सुरू झाली.

कर्तव्य पथावरील संचलनातील महाराष्ट्राच्या कलावंतांची कामगिरी गौरवस्पद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ही प्रक्रिया येत्या १२ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. आरटीजीएस – एनईएफटीसह अनामत रक्कम भरून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १२ एप्रिल अशी आहे. कोकण मंडळाच्या सोडतीला १३ दिवसांत मिळालेला प्रतिसाद पूर्वीच्या तुलनेत काहीसा कमी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *