ठळक बातम्या

Dombivli Riksha : बेशिस्त रिक्षा चालक, दुचाकी, मोटार चालकांवरील कारवाईत डोंबिवलीत एक लाख ४५ हजारांचा दंड वसूल

डोंबिवली, दि. ६
वाहतूक नियम, मोटार वाहन कायद्यातील नियम न पाळणाऱ्या ६२ बेशिस्त रिक्षा चालक, दुचाकी, मोटार चालकांवर कारवाई करुन पथकाने एक लाख ४५ हजारांचा दंड वसूल केला. डोंबिवलीत वाहतूक विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे ही मोहीम राबविण्यात आली.

Dombivli Rikshaw : डोंबिवली पश्चिम ते सावित्रीबाई फुले नाट्यगृह… सांगितले १०० रुपय, ८० रुपयांवर तयार झाला आणि मीटरने झाले फक्त ४८ रुपये…

डोंबिवली शहराच्या विविध भागात अनेक रिक्षा चालक, दुचाकी स्वार अन्य वाहन चालक वाहतूक नियमांचे पालन न करता वाहने चालवितात. अनेक रिक्षा चालक सुट्टीसाठी गावी गेले आहेत. या रिक्षा चालकांच्या रिक्षा काही शाळकरी मुले भाड्याने चालविण्यास घेऊन प्रवासी वाहतूक करतात.

मुलांच्या मनात सांस्कृतिक पर्यावरण रुजवणे गरजेचे- प्रा. प्रवीण दवणे

डोंबिवलीतील टिळक चौक, दिनदयाळ चौक, विष्णुनगर मासळी बाजार भागात अचानक रिक्षा, दुचाकी तपासणी मोहीम सुरू केली. यावेळी अनेक रिक्षा चालकांकडे परवाना, अनुज्ञप्ती परवाना नव्हता. काहींकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता. काही रिक्षा चालक गणवेशात नव्हते.

रस्त्यावर पडलेल्या कच-याची तक्रार आता व्हॉट्स अपवर – बृहन्मुंबई महापालिकेची सुविधा सोमवारपासून सुरु

दर आठवड्याला पथकांकडून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. कारवाई सुरू झाल्यानंतर सर्व बेशिस्त वाहन चालक रेल्वे स्थानक, मुख्य रस्त्यांवरुन गायब झाले होते.
—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *