* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> रस्त्यावर पडलेल्या कच-याची तक्रार आता व्हॉट्स अपवर – बृहन्मुंबई महापालिकेची सुविधा सोमवारपासून सुरु – मुंबई आसपास मराठी
ठळक बातम्या

रस्त्यावर पडलेल्या कच-याची तक्रार आता व्हॉट्स अपवर – बृहन्मुंबई महापालिकेची सुविधा सोमवारपासून सुरु

मुंबई, दि. ३
मुंबई आणि उपनगरांत रस्त्यावर पडलेल्या कच-याची तक्रार आता थेट महापालिका प्रशासनाकडे भ्रमणध्वनीवरून व्हॉट्स अपवर करता येणार आहे. बृहन्मुंबई महापालिकेची ही सुविधा सोमवारपासून ( ५ जून) सुरु होणार आहे.

भारतीय प्रशासन सेवेतील २० अधिकाऱ्यांच्या बदल्या – बहुचर्चित तुकाराम मुंढे आता मराठी भाषा विभागाचे सचिव

सार्वजनिक ठिकाणी साचणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाबाबत केलेल्या तक्रारींचे निराकरण व्हावे, कचऱ्याबाबत नागरिकांना तक्रार अथवा सूचना नोंदविता यावी यासाठी महानगरपालिकेने ८१६९६८१६९७ हा व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.

कडोंमपातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन अदालत

कचरा न उचलणे, रस्ता स्वच्छ नसणे, मृत जनावरे उचलणे आदींबाबतच्या तक्रारी थेट छायाचित्रासह नागरिकांना करता येणार आहेत. तक्रारीसोबत छायाचित्र, त्या ठिकाणाचा पत्ता / जीपीएस लोकेशन पाठवणे आवश्यक आहे. ८१६९६८१६९७ या व्हॉट्सॲप चॅटबॉटवर या तक्रारीची नोंद झाल्यानंतर ती संबंधित विभागाकडे थेट जाणार आहे.

रायगड किल्ल्यावर शिवसृष्टी उभारण्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महापालिका घनकचरा व्यवस्थापन अधिकारी या तक्रारीचे निश्चित केलेल्या वेळेत निर्मुलन करून त्या ठिकाणचे छायाचित्र अपलोड करणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुंबईत घन कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी नागरिकांना थेट संपर्क सेवा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली होती.

नवी मुंबईतील घरांना मालमत्ता कर माफी देण्यासाठी प्रस्ताव सादर करावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापनाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *