श्री मनुदेवी, पारोळा बालाजी मंदिरांसह जळगावमधील ३४ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता – महाराष्ट्र मंदिर महासंघाची माहिती

मुंबई, दि. ५
जळगाव जिल्ह्यातील ३४ मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
जळगावमधील प्रसिद्ध देवस्थान सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी, पारोळा येथील श्री बालाजी मंदिर, श्री पद्मालय देवस्थान, एरंडोल या मंदिरांसह ३४ हून अधिक मंदिरात येत्या आठवड्यात तर जळगाव जिल्ह्यातील अन्य मंदिरांमध्ये येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत वस्त्रसंहिता लागू करण्याचे येईल, असे सांगण्यात आले.
पारोळा बालाजी मंदिराचे विश्वस्त केशव क्षत्रिय, सातपुडा निवासिनी मनुदेवी मंदिराचे सचिव नीलकंठ चौधरी, सनातन संस्थेचे नंदकुमार जाधव, ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे विधि सल्लागार आणि महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ विधिज्ञ भरत देशमुख, जळगाव येथील ओंकारेश्वर मंदिराचे जुगल किशोर जोशी, एरंडोल येथील प्राचीन श्री पद्मालय मंदिराचे विश्वस्त डॉ. पांडुरंग पिंगळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
बुरख्याच्या सक्तीला ‘मूर्खपणा’ म्हणण्याची हिंमत भुजबळ, पुरोगामी आणि ब्रिगेडी मंडळी दाखवतील का?
—-
