पर्यटनाला चालना देणाऱ्या विविध प्रकल्पांना शिखर समितीची मान्यता
‘सह्याद्री’ अतिथीगृहातील बैठकीत प्रकल्पांचे सादरीकरण
मुंबई, दि. १
राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत विविध पर्यटन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट
राज्यात पर्यटनवाढीसाठी मोठा वाव असून प्रत्येक विभागातील पर्यटनस्थळांचा दर्जा वाढवितानाच पर्यटकांच्या सोयीसाठी त्या ठिकाणी चांगले रस्ते, दळणवळणाची साधने, निवासाची दर्जेदार व्यवस्था करण्याची सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
पंढरीच्या आषाढी वारीसाठी येणाऱ्या वाहनांना परतीच्या प्रवासासह टोल माफ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सिंधुदूर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपाप्रकरणी केंद्र सरकार संवेदनशील- केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर
‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीत गोसीखुर्द येथे जलपर्यटन, नागपूर येथील सोनेगाव तलावाचे सुशोभीकरण, कार्ला लोणावळा येथे चाणक्य सेंटर फॉर एक्सलन्स, मिठबाव येथील गजबादेवी मंदिर सुविधा प्रकल्पांना यावेळी मंजुरी देण्यात आली.
बृहन्मुंबईतील नालेसफाईबाबत व्हॉट्स अपवर तक्रार करता येणार
गोसीखुर्द जलाशय जिल्हा भंडारा येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यावेळी या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. देशातील सर्वोत्तम असा हा जलपर्यटन प्रकल्प वेळेपूर्वी जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात ‘निर्भय बनो’ चे महेश निंबाळकर यांंचे आंदोलन
हा प्रकल्प भंडारा आणि नागपूर या दोन्ही जिल्ह्यांच्या किनाऱ्यावर होत असून याठिकाणी सुरू असलेला अंभोरा मंदीर विकास प्रकल्प आणि जलपर्यटन प्रकल्प एकत्रित करण्याची सूचना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
एमटीडीसीच्या माध्यमातून लोणावला कार्ला येथे करण्यात एमआयसीई सेंटर आणि चाणक्य सेंटर फॉर एक्सलन्स संदर्भात सादरीकरण करण्यात आले. कार्ला येथील एमटीडीसी पर्यटक निवासाला एमआयसीई (मिटींग, इन्सेटिव्ह, कॉन्फरन्स, एक्झीबिशन) सेंटर करण्यात येणार आहे.
एमएमआरडीए’चा आपत्कालीन नियंत्रण कक्ष उद्यापासून सुरु
कोयना बामणोली येथे स्कुबा डायव्हिंग तातडीने सुरू करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. नागपूर येथील सोनेगाव तलावाच्या सुशोभीकरणाबाबत सादरीकरण करण्यात आले.
जुन्या आणि मोडकळीस आलेल्या १५ इमारतींची यादी ‘म्हाडा’ कडून जाहीर
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मिठबाव येथील गजबा देवी मंदिर परीसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याबाबत आराखडा सादर करण्यात आला.
बैठकीस महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देवरा, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ उपस्थित होते.
——
