जुन्या आणि मोडकळीस आलेल्या १५ इमारतींची यादी ‘म्हाडा’ कडून जाहीर
मुंबई, दि. १
मुंबईतील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या १५ अतिधोकादायक इमारतींची यादी ‘म्हाडा’ ने जाहीर केली आहे. गेल्या वर्षी अतिधोकादायक म्हणून जाहीर करण्यात आलेल्या सात इमारतींचा यात समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट
‘म्हाडा’ मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील मुंबई शहरातील जुन्या तसेच मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. त्यामध्ये १५ इमारती अतिधोकादायक आढळून आल्या.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात २५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक
या अतिधोकदायक उपकरप्राप्त इमारतींमध्ये ४२४ निवासी आणि १२१ अनिवासी असे एकूण ५४५ रहिवासी राहात आहेत.
१५५ रहिवाशांनी स्वतःची निवार्याची पर्यायी व्यवस्था केली असून आतापर्यंत २१ रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे.
कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात ‘निर्भय बनो’ चे महेश निंबाळकर यांंचे आंदोलन
इमारतींमधील रहिवाशांना जागा सोडण्याची सूचना देण्यात आली असून आलेल्या घरे रिकामी करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
या रहिवाशांनी सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे आणि कार्यवाहीस सहकार्य करण्याचे आवाहन इमारत दुरूस्ती मंडळाने केले आहे.
—
