बृहन्मुंबईतील नालेसफाईबाबत व्हॉट्स अपवर तक्रार करता येणार
मुंबई, दि. १
बृहन्मुंबईतील नालेसफाईबाबत नागरिकांना आता भ्रमणध्वनीवर व्हॉट्स अपद्वारे तक्रार करता येणार आहे. बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने ही ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
९३२४५००६०० या क्रमांकावर तक्रारीचे नेमके ठिकाण, विभाग, दिनांक आणि वेळ ही माहिती नागरिकांना सादर करावी लागणार आहे.
तक्रार दाखल केल्यानंतर तक्रारदाराला तक्रार क्रमांक मिळणार आहे. हा व्हॉट्सअप क्रमांक केवळ माहिती पाठविण्यासाठी असून या क्रमांकावर संभाषण करण्याची सुविधा उपलब्ध असणार नाही, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
——
