राजकीय

महाराष्ट्राचे नाव बदलून अडाणी राष्ट्र करायचे का? उद्धव ठाकरे यांची मोदी शाहांवर टीका

डोंबिवली : हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे,हा महाराष्ट्र गुजरातच्या चरणी व्हायचा की नाही ? याचा विचार महाराष्ट्राच्या जनतेने करायचा आहे.हा महाराष्ट्र मी मोदी शहा आणि अडाणीचा होऊ देणार नाही. महाराष्ट्रा महाराष्ट्राचे नाव बदलून आता अडाणी राष्ट्र करायचे आहे का? असा सवाल शिवसे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी डोंबिवली येथील जाहिर सभेत केला.

कल्याण डोंबिवली : गेल्या पाच वर्षांपासून ‘अगम्य’ असलेल्या लोकप्रतिनिधींना अडचण

कल्याण पूर्व येथील पोटे मैदानात शिवसेना ठाकरे पक्षाचे कल्याण पूर्वचे उमेदवार धनंजय बोडारे, कल्याण पश्चिमचे उमेदवार सचिन बासरे यांच्या प्रचारासाठी तर डोंबिवली पश्चिमेला भाग शाळा मैदान येथे डोंबिवलीचे उमेदवार दिपेश म्हात्रे आणि कल्याण ग्रामीणचे उमेदवार सुभाष भोईर यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

कल्याण ग्रामीण विधानसभा: राजेश मोरे आता मुख्य लढतीत

या सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ज्यांनी नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक खाल्ला, त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. हृदयात राम आणि हाताला काम असं शिवसेनेचे हिंदुत्व असल्याचा पुनरुच्चार ठाकरे यांनी केला .

Dipesh Mhatre Live| डोंबिवली विधानसभा| Uddhav Thakare| Shivsena UBT|

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजप का हरला? याचा विचार भाजपाने करावा . कटेंगे तो बटेंगे ही भीती आम्हाला दाखवू नका. तुमची अवस्था फेटंगे अशी झाली आहे .महाराष्ट्र लुटेंगे आणि दोस्तों को बाटेंगे म्हणून त्यांना महाराष्ट्राची निवडणूक जिंकायची आहे. पण महाराष्ट्र लुटणाऱ्यांना आता महाराष्ट्रातील जनता थारा देणार नाही .लोकसभा निवडणुकीच्या वेळी संविधान वाचवण्याची लढाई होती.

कल्याण पूर्वेच विधानसभा: विकास हेच माझे ध्येय – धनंजय बोडारे

त्या हुकुमशहाला माझ्या महाराष्ट्राने गुढघ्यावर आणून त्यांची जागा दाखवली .आता महाराष्ट्र वाचवण्याची, महाराष्ट्राचा स्वाभिमान वाचवण्याची आणि महाराष्ट्राचे अस्तित्व टिकवण्यासाठी ही लढाई आहे .ही लढाई सुद्धा आपल्याला जिंकावी लागेल .महाराष्ट्र खड्ड्यात गेला आहे .आता चुकलात तर फार वाईट अवस्था होईल,असा इशारा उध्दव ठाकरे यांनी जनतेला दिला आहे.

कल्याण ग्रामीण विधानसभेत तिरंगी लढत, सुभाष भोईर यांच्यासाठी शुभ संकेत

कल्याण डोंबिवली मध्ये रस्त्यांवर खड्डे आजही आहेत.रस्त्यावर धूळ आहे.तरीही विकास केला म्हणून सगळीकडे मोठमोठे होर्डिंग लावले आहेत.

सगळे उद्योग गुजरातला पळविले,आणि म्हणे काम केले भारी आता पुढची तयारी. केली गद्दारी , सगळी माजोरी ,यांना आता बसवा घरी अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांचा देखील ठाकरे यांनी समाचार घेतला.

डोंबिवली विधानसभा: रविंद्र चव्हाण आणि निलेश काळे यांच्यात “सेटलमेंट”

डोंबिवलीत इतकी वर्षे आमदार निवडून देवूनही इथे अजून सिव्हील हॉस्पिटल नाही,मेडिकल कॉलेज नाही की इंजिनियरिंग कॉलेज नाही.अजूनही इथे प्राथमिक सुविधा का नाहीत ? कधी तरी डोंबिवलीकर नागरिकांनी विचार केला पाहिजे. आताची भाजपा संकरित भाजपा आहे .इतर पक्षांतील भ्रष्टाचारी लोकांना सामावून घेणारी भाजपा असल्याची टीका उध्दव ठाकरे यांनी केली.

कोणाच्या दडपशाहीला घाबरणार नाही – दिपेश म्हात्रे यांचा रवींद्र चव्हाण यांना टोला

देवेंद्र फडणवीस आता धर्मयुद्ध करा म्हणून सांगत आहेत.लोकसभा निवडणुकीत आमच्या प्रचार गीतात जय भवानी ,जय शिवाजी आणि हिंदू हे शब्द होते .तर आमच्या गाण्याला निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला.आता निवडणूक आयोग काय करतोय ? असा सवाल त्यांनी केला आहे.