राजकीय

डोंबिवली विधानसभा: रविंद्र चव्हाण आणि निलेश काळे यांच्यात “सेटलमेंट”

डोंबिवलीतून महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण आणि अपक्ष निलेश काळे यांच्यात सेटलमेंट झाला आहे. आणि त्यामुळेच आज निलेश काळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

डोंबिवलीतून संघ कार्यकर्ता निलेश काळे मैदानात

नीलेश काळे यांनी अर्ज मागे घेतल्याने डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांच्या अडचणी कमी होण्याची शक्यता आहे.

डोंबिवली ग्रामीण मंडळ का? त्याचे नाव भाजप मालवण मंडळ ठेवावे

मात्र महाआघाडी शिवसेनेचे उद्धव गटाचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांना सातत्याने वाढत असलेल्या जनसमर्थनामुळे यावेळी भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या डोंबिवली विधानसभा मतदारसंघात चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

मला धनंजय कुलकर्णी व्हायचं नाही ! डोंबिवलीतील भाजपाच्या इच्छुक उमेदवारांनी टाकली नांगी, इच्छुकांना कोणाची भीती?

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. तसेच डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व जनकल्याण समितीचे माजी कार्यकर्ता निलेश काळे यांनीही अर्ज भरला होता.

कल्याण ग्रामीण विधानसभा : भाजपकडून फक्त नंदू परब दावेदार? आगरी समाजाचा नेता का नाही?

त्यामुळे येथील भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांच्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. भाजपचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी सायंकाळी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये त्यांनी नीलेश काळे यांच्याशी समझोता केल्याचे मान्य केले.

जितेंद्र आव्हाड यांच्या मेंदूमध्ये केमिकल लोचा. “अजित पवार पाकेटमार” या विधानावर आनंद परांजपे यांची प्रतिक्रिया

रवींद्र चव्हाण यांनी सोशल मीडिया वर टाकलेला पोस्टमध्ये डोंबिवलीत अनेक समस्या असल्याची कबुली दिली आहे. ज्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणि यापुढे याकडे लक्ष देणार आहे.

दीपेश म्हात्रे डोंबिवलीत ‘मशाल’ हाती घेणार, शिवसेनेच्या शिंदे गटाला मोठा धक्का

याशिवाय नीलेश काळे यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर निलेशच्या समर्थनार्थ ज्या काही पोस्ट टाकल्या आहेत, त्या काढून टाकण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

रवींद्र चव्हाण यांच्या या प्रयत्नातून ते सलग चौथ्यांदा डोंबिवली विधानसभेतून विजयी होण्यासाठी पूर्णपने आशावादी नसल्याचे दिसून येते. कारण त्यांना विरोधक शिवसेनेचे उद्धव गटाचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांच्याशी कडवी टक्कर आहे.