राजकीय

कल्याण ग्रामीण विधानसभेत तिरंगी लढत, सुभाष भोईर यांच्यासाठी शुभ संकेत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी सायंकाळी प्रचार सभेला सुरुवात केल्यानंतर कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची उत्सुकता वाढली आहे.

या भागातून गेल्या वेळी मनसेचे आमदार राहिलेले राजू पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून सुभाष भोईर आणि शिवसेना शिंदे गटाकडून राजेश मोरे रिंगणात आहेत.

डोंबिवली विधानसभा: रविंद्र चव्हाण आणि निलेश काळे यांच्यात “सेटलमेंट”

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी सायंकाळी ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. आणि यानंतर रिंगणात राहिलेल्या उमेदवारांमध्येच निवडणूक होणार आहे.

याठिकाणी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू पाटील सलग दुसऱ्यांदा विजय  मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर २०१४ मध्ये येथून आमदार झालेले सुभाष भोईर हे शिवसेना उद्धव गटाचे उमेदवार आहेत. तसेच शिवसेना शिंदे गटाने राजेश मोरे यांना येथून उमेदवारी दिली आहे.

डोंबिवली विधानसभा : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांचा राजीनामा

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मूळ रहिवासी हे आगरी समाजाचे लोक आहेत. मात्र राज्यातील इतर जिल्ह्यातून आलेल्या मराठी भाषिक, दक्षिण भारतीय, गुजराती भाषिक मतदारांसोबतच मोठ्या संख्येने हिंदी भाषिक मतदारही येथे राहतात.

या वेळी शिवसेना शिंदे गटातील हिंदी भाषिक शिवसेना नेते आणि डोंबिवलीतील हिंदी भाषिक लोकांमध्ये सक्रिय असलेल्या हिंदी भाषी जनता परिषदेचे प्रमुख विश्वनाथ दुबे यांनीही येथून आपला दावा मांडला होता. मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करत शिवसेनेच्या शिंदे गटाने राजेश मोरे यांना तिकीट दिले आहे.

कल्याण ग्रामीण विधानसभा : भाजपकडून फक्त नंदू परब दावेदार? आगरी समाजाचा नेता का नाही?
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सायंकाळी येथील परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट झाली आहे. आणि येथे मुख्य लढत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू पाटील, शिवसेनेचे उद्धव गटाचे सुभाष भोईर आणि शिवसेना शिंदे गटाचे राजेश मोरे यांच्यात आहे.

मनसेचे उमेदवार राजू पाटील सलग गेल्या वेळी येथून विजयी झाले असून, ते पुन्हा विजयासाठी रिंगणात आहेत. साहजिकच त्यांच्याबद्दल मतदारांमध्ये एंटी इन्कन्वेशीची भावना आहे.

विधानसभा निवडणुकीत कल्याण डोंबिवलीच्या चारही जागांवर भाजपचा पराभव होण्याची चिन्हे

यासोबतच या विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना वर्षानुवर्षे होत आहे. ते दूर करण्यात येथील आमदार असलेले राजू पाटील अपयशी ठरले आहेत. असा आरोप स्थानिक नागरिकांचा आहे.

२०१४ साली आमदार झालेले सुभाष भोईर यांचा त्या काळात चांगला कार्यकाळ होता आणि त्यामुळेच त्यांची प्रतिमा लोकांच्या मनात आजही चांगली आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्येही ते पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होते. यावेळी शिवसेनेच्या उद्धव गटाने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

डोंबिवलीतील शिवसेना शिंदे गटाचे युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांचा ठाकरे गटात प्रवेश

येथून महायुतीचे उमेदवार राजेश मोरे निवडणूक लढवत असून त्यांना भाजप डोंबिवली ग्रामीणचाही पाठिंबा मिळत आहे