राजकीय

आगरी सेनेचा कल्याण पश्चिमेतील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर याना पाठींबा

कल्याण पश्चिमेतील शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाइं महायुतीचे उमेदवार विश्वनाथ आत्माराम भोईरयाना आगरी सेनेतर्फे पाठींबा जाहीर करण्यात आला आहे.

आगरी जिल्हा प्रमुख चंद्रकांत ठाणकर यांनी या पाठिंब्याचे पत्र कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ आत्माराम भोईर यांना दिले आहे.

आगरी सेनेच्या या पाठिंब्याच्या पत्रामुळे कल्याण पश्चिमेतील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांची स्थिती नि:संशय भक्कम झाली आहे.

राज्यात 5 लाख कोटी रुपयांचे उद्योग आणले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

2024 म्हणजेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतपण आगरी सेनेने महायुतीला पाठिंबा दिला होता.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही तशाच प्रकाराचा पाठिंबा जाहीर करत महायुतीच्या हातून राज्यातील गोरगरीब जनतेची सेवा घडावी, यासाठी हा जाहीर पाठिंबा देत असल्याचे आगरी सेनेचे प्रमुख राजाराम साळवी यांनी पत्रात नमूद केले आहे.