मराठा आरक्षण आंदोलनात मार्ग काढण्यासाठी पुढाकार घ्या – महाविकास आघाडीच्या नेत्यांचे राज्यपाल बैस यांना निवेदन
मुंबई दि.३० :- मराठा आरक्षण आंदोलनात मार्ग काढण्यासाठी आपण पुढाकार पुढाकार घ्यावा, तसेच या विषयावर तातडीने विधिमंडळाचे अधिवेशन बोलावून त्यात निर्णय घ्यावा, अशी मागणी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राजभवन येथे राज्यपाल बैस यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणी निवेदन सादर केले.
मुंबई, ठाणे पट्टय़ातील प्रदूषणामुळे खाड्यांमधील माशांच्या ४८ प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर
या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे. आपण राष्ट्रपती, पंतप्रधान आणि उपोषणकर्ते जरांगे पाटील यांच्याशी बोलावे. काही अघटीत घडू नये यासाठी मध्यस्थी करावी आणि हा प्रश्न प्रश्न सोडवावा, अशी विनंतीही यावेळी राज्यपालांना करण्यात आली.
मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर – पुढील वर्षी २१ एप्रिलला मतदान
या शिष्टमंडळात बाळासाहेब थोरात, नाना पटोले, जयंत पाटील, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे आणि तिन्ही पक्षाच्या आमदारांचा सहभाग होता.