मराठा आरक्षण आंदोलन भरकटले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई दि.३० :- मराठा आरक्षण आंदोलन सध्या भरकटत चालले आहे, याचा विचार मनोज जरांगे पाटील, त्यांचे सहकारी तसेच सकल मराठा समाजाने करावा असे, आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. ‘सह्याद्री’ अतिथीगृहा येथे मराठा आरक्षण उपसमितीची बैठक झाल्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
हे आंदोलक हिंसक का होत आहे, याच्या मागे कोण आहे, ज्या आत्महत्या होत आहेत त्या का होत आहेत? याकडेही मराठा समाजाने आणि समाजातील नेत्यांनी गांभीर्याने पाहावे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात टिकणारे आरक्षण आणि कुणबी दाखले शोधणे अशा दोन पातळीवर सरकारचे काम सुरु आहे. मराठा आंदोलकांनी कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, शांतता राखावी, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
मुंबई, ठाणे पट्टय़ातील प्रदूषणामुळे खाड्यांमधील माशांच्या ४८ प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर
मराठा समाजाबाबत सहानुभूती आहे, शिस्तीची परंपरा आहे, देशाने शिस्त पाहिली, त्याला गालबोट लागेल, असे कोणी करू नये. यामुळे मराठा समाजाबाबतची सहानुभूती कमी होईल, यापूर्वी मराठा आंदोलन शांततेने झाली. त्याला आता कोण गालबोट कोण लावताय, याचा विचार आंदोलनकर्त्यांनी केला पाहिजे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.