मुंबई, ठाणे पट्टय़ातील प्रदूषणामुळे खाड्यांमधील माशांच्या ४८ प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर
मुंबई दि.३० :- मुंबई आणि ठाणे पट्टय़ातील प्रदूषणामुळे येथील खाड्यांमधील माशांच्या ४८ प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असून यात . चिंबोरी, कालवे, मांदेली यांचा समावेश आहे.
ठाणे जिल्ह्यातील मतदारांच्या संख्येत वाढ
१९९० नंतर सुरू झालेली विकासकामे आणि सीआरझेड कायद्यानुसार ५०० मीटपर्यंत बांधकामांवर असलेली बंधने शिथिल झाल्याने हा परिणाम झाला आहे. माशांची अंडी देण्याची ठिकाणे चिखल आणि रासायनिक कचऱ्याने भरली आहेत. त्यामुळे मासे तेथे अंडी घालत नाहीत. परिणामी खाडीत आढळून येणाऱ्या अनेक मत्स्य प्रजाती कायमस्वरूपी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.