आमदार अपात्रता प्रकरणी येत्या ३१ डिसेंबरपर्यंत अंतिम निर्णय घ्यावा
सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांना आदेश
नवी दिल्ली दि.३० :- आमदार अपात्रता प्रकरणी येत्या ३१ डिसेंबरपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आज दिले.
मराठा आरक्षण आंदोलन भरकटले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर पूर्ण करा, असे आदेश गेल्या सुनावणीच्या वेळी नार्वेकर यांना देण्यात आले होते. त्यावर नार्वेकर यांनी वेळापत्रक तयार करून आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागेल, असे सांगितले होते. मात्र यावर नाराजी व्यक्त करून सुधारित वेळापत्रक सादर करण्यास नार्वेकर यांना सांगण्यात आले होते.
नार्वेकर यांनी आज सुधारित वेळापत्रक सादर केले. मात्र, हे वेळापत्रकही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावून येत्या ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश दिले.