ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना उद्यापासून दाखले द्यायला सुररुवात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
मुंबई दि.३० :- कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना दाखले देणार आहोत. याबाबत तहसीलदारांची बैठक घेऊन उद्यापासूनच दाखले द्यायला सुररुवात केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी केली. सह्याद्री अतिथीगृहा येथे मराठा आरक्षण उपसमितीची बैठक झाल्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
आमदार अपात्रता प्रकरणी येत्या ३१ डिसेंबरपर्यंत अंतिम निर्णय घ्यावा
माजी न्यायमूर्ती शिंदे समितीने अहवाल सविस्तर सादर केला असून बैठकीत त्यावर सविस्तर चर्चा झाली. मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर चर्चा करून पुढील प्रक्रिया केली जाणार आहे. समितीने १ कोटी ७२ लाख नोंदी तपासल्या असून यात ११ हजार ५३० नोंदी मिळाल्या आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
मराठा आरक्षण आंदोलन भरकटले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मूळ मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द झाले. त्यावर सरकार काम करत असून तज्ज्ञ संस्था समितीला मदत करणार आहेत इन्पेरिकल डेटा युद्धपातळीवर जमा करून आरक्षणाठी प्रयत्न केला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ज्या त्रुटी काढल्या त्या दूर करण्यासाठी तीन सदस्यीय तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.