जे. जे. रुग्णालयातील शस्त्रक्रियागृह, रुग्णकक्ष लवकरच अद्ययावत होणार; राज्य शासनाला प्रस्ताव सादर
मुंबई दि.२५ :- जे. जे. रुग्णालयातील शस्त्रक्रियागृह आणि रुग्णकक्ष अद्ययावत करण्यात येणार असून रुग्णालय प्रशासनाने यासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाला पाठविला आहे. रुग्णालयातील नाक, कान, घसा विभाग, सुघटनशल्य चिकित्सा विभाग, लहान मुलांचे विभाग आणि शल्यचिकित्सा विभागाचे सुसज्ज शस्त्रक्रियागृह करण्यासंदर्भात राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
माजी खासदार नीलेश राणे यांची सक्रिय राजकारणातून निवृत्ती
तसेच उर शल्यचिकित्सा विभागाप्रमाणे चार रुग्ण कक्ष अद्ययावत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मज्जातंतू शास्त्र विभाग, शल्यचिकित्सा विभाग, हृदयशल्यचिकित्सा विभाग आणि अन्य एका विभागाचे अद्ययावतीकरण करण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हा नियोजन विकास समितीकडे पाठविण्यात आला आहे.
मुंबईत उद्या शिवसेना आणि उबाठा गटाचा दसरा मेळावा – दोन्ही गटांकडून शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी
या दोन्ही प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर जे.जे. रुग्णालयातील शस्त्रक्रियागृह आणि अद्ययावत रुग्ण कक्ष उभारण्याच्या कामाला सुरूवात होणार आहे.