राजकीय

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दुहीची बीजे पेरून राजकीय पोळी भाजण्याचे भाजपचे कारस्थान- उद्धव ठाकरे

मुंबई दि.२५ :- मराठा आरक्षणावरुन जाती-जातींमध्ये द्वेष आणि संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न काही पक्ष करीत असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केला. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध आहे.

जे. जे. रुग्णालयातील शस्त्रक्रियागृह, रुग्णकक्ष लवकरच अद्ययावत होणार; राज्य शासनाला प्रस्ताव सादर

या समाजाचे दु:ख आपण जाणत असून आरक्षण मिळवून देण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणार असल्याची ग्वाही त्यांनी आझाद मैदानात झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात दिली. जातीपातींमध्ये भिंती उभारून आणि दुहीची बीजे पेरून राजकीय पोळी भाजण्याचे कारस्थान भाजप करीत आहे.

राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यातील नागरिकांना दस-याच्या शुभेच्छा

मराठा आरक्षणातही मोडता घालण्याचे काम भाजपकडून सुरू असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केला.
शिवाजी उद्यानात झालेल्या दसरा मेळाव्यात ठाकरे बोलत होते केला. मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने संसदेत विधेयक आणून आरक्षण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *