* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> माजी खासदार नीलेश राणे यांची सक्रिय राजकारणातून निवृत्ती – मुंबई आसपास मराठी
ठळक बातम्या

माजी खासदार नीलेश राणे यांची सक्रिय राजकारणातून निवृत्ती

मुंबई दि.२४ :- माजी खासदार आणि नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा मंगळवारी केली. राणे यांनी ‘एक्स’ वर त्यांनी पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे. आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही, असे राणे यांनी म्हटले आहे.

राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यातील नागरिकांना दस-याच्या शुभेच्छा

मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळाले आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचे मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढविणे वगैरे यात मला आता रस राहिला नाही, असे राणे यांनी म्हटले आहे.

दहावीचा निकाल कमी लागलेल्या महापालिका शाळांच्या मुख्याध्यापकांना नोटीस

टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे स्वतःचा आणि इतरांचा वेळ वाया घालविणे मला पटत नाही. कळत नकळत काही लोकांना दुखावले असेन तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, असेही राणे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *