सागरी व्यापार क्षेत्रातील गुंतवणूकदारांना भारतात मोठी संधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई दि.१७ :- जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेकडे भारताची वाटचाल सुरू आहे. सागरी व्यापाराचा यात मोठा वाटा असणार आहे. बंदरे, जहाजबांधणी क्षेत्रातील जागतिक गुंतवणूकदारासाठी भारतात गुंतवणूक करण्याची मोठी संधी आहे. येत्या काळात सागरी व्यापार क्षेत्रातही आघाडीचा देश म्हणून भारताचे नाव घेतले जाईल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
पर्यावरण दक्षता मंडळातर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे तिसऱ्या ग्लोबल मेरीटाइम इंडिया समिट (GMIS) २०२३ चे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. मुंबईतील एमएमआरडीए मैदानावर आजपासून ही परिषद सुरू झाली. येत्या १९ ऑक्टोबरपर्यंत ही परिषद चालणार आहे.राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय बंदर व जलवाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, फिक्कीचे प्रेसिडेंट सुभ्रकांत पांडा तसेच विविध देशांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या ब्रेल लिपीतील पुस्तकाचे राज्यपाल बैस यांच्या हस्ते प्रकाशन
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भारतीय सागरी नील अर्थव्यवस्थेसाठीच्या ‘अमृत काल व्हिजन २०४७ चे प्रकाशन करण्यात आले. पंतप्रधानांच्या हस्ते २३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांची मुहूर्तमेढ करण्यात आली. यात गुजरातमधील दीनदयाल बंदर प्राधिकरण येथे ४ हजार ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या टूना टेक्रा ऑल-वेदर डीप ड्राफ्ट टर्मिनलच्या कोनशिलेचे अनावरण देखील पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सागरी क्षेत्रात जागतिक आणि राष्ट्रीय भागीदारीसंदर्भात झालेले ७ लाख कोटींहून अधिक किंमतीचे ३०० हून अधिक सामंजस्य करार देखील करण्यात आले.
ठाणे जिल्ह्यात ‘महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशन’ राबविणार
देशातील वारसा जपण्याचे काम आपण करत आहोत. त्यादृष्टीने लोथल डॉकयार्ड येथे राष्ट्रीय मेरीटाइम कॉम्प्लेक्स बनवले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केले. मुंबई पोर्ट ट्रस्टला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्धल एका टपाल तिकिटाचे आणि पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. केंद्रीय बंदरे सचिव श्री टी के रामचंद्रन यांनी प्रास्ताविक केले. राज्यपाल बैस, मुख्यमंत्री शिंदे तसेच फिक्कीचे प्रेसिडेंट सुभ्रकांत पांडा, उपस्थित विविध देशांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून श्रीलंकेचे बंदरे व जहाज मंत्री निर्मल डिसिल्वा यांनीही मनोगत व्यक्त केले. मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी आभार मानले. याशिवाय, देशातील विविध राज्यांचे मंत्री आणि इतर मान्यवर या शिखर परिषदेत आपापल्या राज्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उपस्थित आहेत.