पर्यावरण दक्षता मंडळातर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन
डोंबिवली दि.१७ :- पर्यावरण दक्षता मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त इयत्ता ७ वी आणि ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. माझ्या कल्पनेतील जंगल आणि वनवासींची जीवनशैली हे चित्राचे विषय आहेत. स्पर्धेतील चित्रांचे प्रदर्शन येत्या २९ ऑक्टोबर रोजी श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली पूर्व येथे भरविण्यात येणार आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या ब्रेल लिपीतील पुस्तकाचे राज्यपाल बैस यांच्या हस्ते प्रकाशन
तसेच सर्व वयोगटासाठी पर्यावरण संवर्धनासाठी तुम्ही काय करता? यासंदर्भातील रील बनविण्याची स्पर्धा होणार आहे. स्पर्धकांनी रील paryavarandom@gmail.com या ई मेलवर पाठवायचे आहेत. या दोन्ही स्पर्धांचा बक्षीस समारंभ येत्या २९ ऑक्टोबररोजी ‘वयम् चळवळी’चे प्रणेते मिलिंद थत्ते यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेसाठी चित्र आणि रील पाठवण्याची शेवटची तारीख २३ ऑक्टोबर २०२३ आहे.