Thursday, June 25, 2026
Latest:
ठळक बातम्या

ठाणे जिल्ह्यात ‘महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशन’ राबविणार

मुंबई दि.१७ :- राज्यात रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तसेच जास्तीत जास्त उद्योजक निर्माण होण्यासाठी राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशनच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून झाला.

ठाणे जिल्ह्यात नऊ ठिकाणी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रे सुरू करणार

पहिल्या टप्प्यातील सहा जिल्ह्यांमध्ये ठाणे जिल्ह्याचाही समावेश आहे. राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग व ग्लोबल अलायन्स फॉर इंटरप्रोन्यूरशिप (गेम) यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशन राबविण्यात येणार आहे.

बाळासाहेब आपला दवाखाना’ वर्षपूर्तीच्या निमित्ताने जनजागृतीपर गीताच्या ध्वनिफितीचे प्रकाशन

भांडवलासोबतच कौशल्यपूर्ण मनुष्यबळ, उद्योजक अशी साखळी निर्माण करुन जागतिक संधी प्राप्त करण्यास महाराष्ट्र राज्य उद्योजकता मिशन सहाय्यभूत ठरेल आणि राज्य विकासाच्या मार्गाने वेगाने पुढे जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *