मुसलमानांना नवरात्रोत्सवात सहभागी व्हायचे असेल, तर त्यांनी हिंदु धर्मात प्रवेश करावा- आमदार नितेश राणे
मुंबई दि.१६ :- हिंदूंच्या नवरात्रोत्सवात मूर्तिपूजा होते. मुसलमान मूर्तिपूजा मानत नाहीत, तर मूर्तिपूजा होते, तिथे ते का शिरकाव करत आहेत ? पूर्वीचे हिंदू असलेल्या आत्ताच्या मुसलमानांना हिंदूंच्या नवरात्रोत्सवात सहभागी व्हायचे असेल, तर त्यांनी रितसर हिंदू धर्मात प्रवेश करावा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसाच्या मुंबई भेटीवर
हिंदू जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘नवरात्रोत्सवात गैर हिंदूंना प्रवेश वर्ज्य’ या विषयावरील विशेष संवादात बोलत होते. हिंदू जनजागृती समितीचे दिल्ली प्रवक्ते नरेंद्र सुर्वे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. नवरात्रोत्सवातील गरबा कार्यक्रमात अनेक मुसलमान युवक आपले खोटे ‘हिंदू’ नाव सांगून हिंदू युवतींशी ओळख वाढवतात. नंतर हेच विषय ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतरा’पर्यंत जातात. हे सर्व रोखण्यासाठी नवरात्रोत्सव मंडळांनी गरबा कार्यक्रमात प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्ड तपासूनच सर्वांना प्रवेश द्यावा. ती व्यक्ती हिंदू नसल्यास त्यांना प्रवेश देऊ नये. हिंदू युवतींनीही आपण कोणाबरोबर गरबा खेळतो आहोत, याविषयी सतर्क राहावे. आपली मुलगी सुरक्षित घरी येत आहे ना, याकडे पालकांनीही लक्ष द्यावे.
‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी गरब्यात अहिंदूंना प्रवेशबंदी करा !
भारतातील अन्य राज्यांत लागू झालेल्या ‘लव्ह जिहादविरोधी कायद्या’चा अभ्यास करून महाराष्ट्रातही कडक आणि परिणामकारक असा कायदा येत्या डिसेंबरमध्ये होणार्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात करण्यात येणार आहे. ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लँड जिहाद’च्या प्रकरणांमुळे भारतात मुंबईसह अनेक शहरांत हिंदु लोकसंख्या कमी होत चालली असून हिंदूंनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, असेही आमदार राणे यांनी सांगितले.