* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी गरब्यात अहिंदूंना प्रवेशबंदी करा ! – मुंबई आसपास मराठी
Wednesday, February 21, 2024
Latest:
ठळक बातम्या

‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी गरब्यात अहिंदूंना प्रवेशबंदी करा !

हिंदू जनजागृती समितीचे आवाहन

मुंबई दि.१४ – हिंदू मुली आणि महिला यांच्या सुरक्षेसाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी अहिंदूंना गरब्यात प्रवेशबंदी करावी आणि असा मोठा फलक प्रत्येक गरब्याच्या ठिकाणी लावावा, असे आवाहन हिंदू जनजागृती समितीने नवरात्रोत्सव मंडळे आणि गरबा आयोजकांना केले आहे. राष्ट्रीय नेमबाज तारा सहदेव हिच्याशी हिंदू म्हणून ओळख सांगत विवाह करणार्‍या आणि नंतर इस्लाम कबूल करण्यासाठी मारहाण करणारा तिचा पती रकीबुल हसन याला झारखंड येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जन्मठेपेची, तर धर्मांतरासाठी दबाव आणणार्‍या रकीबुलच्या आईला दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

या प्रकरणातून ‘लव्ह जिहाद’ पुन्हा एकदा कायदेशीरदृष्ट्या सिद्ध झाला आहे. गेल्या काही वर्षांत हिंदू मुलींना येनकेन प्रकारेन खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून हिंदु मुलींना धर्मातरित करण्यात आले आहे, तर याला विरोध करणार्‍या अनेक श्रद्धा वालकरचे निर्घृण हत्या करण्यात आल्या आहेत. ‘लव्ह जिहाद’विषयी केवळ हिंदू संघटनाच नव्हे, तर अनेक ख्रिस्ती संघटना आणि ख्रिस्ती धर्मगुरु यांनीही आवाज उठवला आहे. या पार्श्वभूमीवर हिंदु मुलींना ‘लव्ह जिहाद’पासून वाचवण्यासाठी गरब्याच्या ठिकाणी प्रवेशद्वारावर सुरक्षाव्यवस्था उभारावी.

नवरात्रोत्सवास उद्यापासून सुरुवात; महालक्ष्मी मंदिर परिसरावर सीसी टीव्ही कॅमेऱ्याची नजर

यामध्ये गरब्यात प्रवेश करणार्‍या प्रत्येकाचे आधारकार्ड तपासावे, त्यांच्या नावांची खात्री करावी आणि मगच प्रवेश द्यावा. तसेच प्रत्येक मुलाला-पुरुषाला आत जातांना टिळा लावावा. जेणेकरून अहिंदू ‘लव्ह जिहाद्यां’ना या उत्सवापासून दूर ठेवता येईल, असे समितीने म्हटले आहे. देशातील सहा राज्यांत ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ बनविण्यात आला असून महाराष्ट्र, गोवा आदी राज्यांत हा कायदा बनवण्याची मागणी जोर धरत आहे. महाराष्ट्रात हा कायदा व्हावा, यासाठी समितीसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मोठ्या संख्येने मोर्चे काढले आहेत, तसेच मा. मुख्यमंत्री यांनीही ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करण्याची ग्वाही दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *