‘भारतात ‘खलिस्तान’ची निर्मिती होणे अशक्य – अनय जोगळेकर
डोंबिवली दि.०८ :- भारतात खलिस्तान निर्माण होणे कोणत्याही परिस्थिती शक्य नाही, असे प्रतिपादन प्रसिद्ध यूट्यूबर, स्तंभ लेखक आणि राजकीय विश्लेषक अनय जोगळेकर यांनी येथे केले. अभ्युदय प्रतिष्ठान संचालित नाना ढोबळे स्मृती ग्रंथालयातर्फे टिळकनगर विद्या मंदिर येथे आयोजित केलेल्या ‘खलिस्तान – काल, आज आणि उद्या’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभ्युदय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीपाद जोशी होते.
शीख पंथ मुळात भक्तीमार्गासाठी श्री गुरुनानक देव यांनी स्थापन केला. नंतरच्या काळामध्ये खालसा पंथाची स्थापना मुघली अत्याचारान विरोधात लढण्यासाठी केली गेली. मात्र ब्रिटिशांनी पद्धतशीरपणे शिखांना हिंदूंपासून वेगळे काढण्याचा प्रयत्न केला, असे जोगळेकर यांनी सांगितले.
स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो खलिस्तानवादी शिखांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली पाठिंबा देत आहेत. पण प्रत्यक्ष पंजाब मध्ये ९५% पेक्षा अधिक शिखांचा खलिस्तानला विरोध आहे. सध्याच्या मोदी सरकारने कॅनडाच्या ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांना परत पाठवायची भूमिका घेऊन ट्रुडो यांच्या खोडसाळपणाला चोख प्रत्युत्तर दिले आहे, असे जोगळेकर म्हणाले.